सावर्डे आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूल यांचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

सावर्डे येथील आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्यावतीने वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रमुख उपस्थिती आमदार राजू बाबा आवळे यांच्या उपस्थितीत पार पडला विद्यार्थिनींनी सादर केलेल्या विविध कलागुणांचा आनंद घेतला, तसेच चिमुकल्यांची कलाकारी मन प्रसन्न करणारी होती, तसेच यावर्षी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, सदर कार्यक्रमात सायन्स फेस्ट, फूड फेस्टिवल, तसेच पालकांसाठी हळदी कुंकू आदी उपक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी उपस्थित सावर्डे गावचे सरपंच अमोल कांबळे, हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव बबनराव पाटील, माजी सरपंच शिवाजीराव भोसले, अशोक नारंदेकर, चेतन चव्हाण, सुरेश देसाई, शरद चव्हाण प्राचार्य विजयमाला कांबळे, तसेच शिक्षक व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.