
वेळापूर येथे रिद्धी सिद्धी ग्रुप व संघर्ष ग्रुपच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी वेळापूर ग्रामपंचायत सदस्य दु र्गेश गरुड व जयंतीचे अध्यक्ष राहुल नेटारे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.तसेच पत्रकार दीपक गरुड व एकलव्य संघटनेचे शहराध्यक्ष रामभाऊ राजोळे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला .अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शाहीरी आनि साहित्त्य प्रतिभेच्या माध्यमातून उपेक्षित कामगारांच्या लढाईचा आवाज बुलंद केला. समाजजागृत केला.संयुक्त महाराष्ट्र चळवळीत प्राण फुंकले,असे प्रतिपादन वेळापूर ग्रामपंचायत सदस्य दुर्गेश गरुड यांनी या वेळी केले. यावेळी जयंती अध्यक्ष राहुल नेटारे किशोर बदामे दीपक गरुड शाहूल बारशे रोहन गरुड जगदीश बदामे अक्षय गरुड सागर नेटारे रुपेश पारखे सोमनाथ सोनवणे गोरख गरुड आदी उपस्थीत होते.सूत्रसंचालन जगदीश बदामे यांनी केले तसेच जयंतीचे उपाध्यक्ष शाहूल बारशे यांनी आभार मानले.