
शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगांव. ता.चांदवड.जि.नाशिक. विद्यालयाचे *प्रयोगशाळा परिचर श्री.उत्तम (बाबा)शामपुरी गोसावी.* ३९ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर दि.३१ जुलै २०२३ रोजी सेवानिवृत्त झाले. बाबा आणि त्यांच्या कुटुंबियांनी न भूतो न भविष्यती असा अद्भूत पूर्व सोहळा मोठ्या दिमाखात अश्वरथातून वाजतगाजत गावातून मिरवणूक काढून नंतर शाळेच्या प्रांगणात सत्कार समारंभानंतर विद्यार्थ्यांसह आप्तस्वकियांच्या उत्कृष्ट भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.या सेवापूर्ती सोहळ्या निमित्ताने बाबांनी आलेल्या मान्यवरांना देखील शाल व श्रीफळ देऊन सन्मानित केले.यानिमित्ताने सर्वांनी बाबांना पुढील नवीन इनिंग च्या तसेच भावी आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण मंडळ भगूर संचलित संस्थेचे अध्यक्ष श्री. डॉ. K. P. गांगुर्डे सर(काका) होते.तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष व नू.मा. वि. चे माजी मुख्याध्यापक श्री. एकनाथरावजी शेटे सर(बाबा), संस्थेचे सन्माननीय सर्व संचालक मंडळ, शाळेचे मुख्याध्यापक श्री. विजय अ. सानप सर, पर्यवेक्षक श्री. बोढारे सर सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी बाबांना पुढील नवीन इनिंगच्या व भावी आयुष्याच्याभरभरून शुभेच्छा दिल्या.