धनोली जिल्हा परिषद शाळेतील वर्धापन दिननिमित्त स्नेह मेळाव्यात शालेय आठवणीत रमले माजी विद्यार्थी
माधव आहेर

धनोली : कळवण तालुक्यातील धनोली येथील जिल्हा परिषद शाळेची स्थापना 19/02/1958 ला स्थापना झाली आहे. या निमित्ताने शाळेचा वर्धापन दिन व शुभारंभाच्या पहिल्याच तुकडीतील माजी विद्यार्थाचा स्नेह मेळावा घेण्यात आला. कार्यक्रमांची सुरुवात करताना पहिल्या महिला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छ.शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पुज्या करण्यात आली.
मेळाव्यास सध्या विविध क्षेत्रात कार्यरत,तसेच काही सन्मानाने सेवानिवृत माजी विद्यार्थी उपस्थित राहून आपल्या आयुष्यातील पहिल्या शाळेतील पहिल्या दिवसाबद्दल माहितीपूर्ण सांगितली.व बालपनातील शालेय अनुभव कथन करताना माजी विद्यार्थी श्री.लक्ष्मण गोविंदा गांगुर्डे व श्री. पुंडलिक काशीराम पाडवी यांनी शाळेतील जुन्या आठवणी सांगितल्या.
जिल्हा परिषद शाळेतील शाळा व्यवस्थापन समिती धनोली येथे शाळा स्थापना दि.19 फेब्रुवारी 1958 दाखल वर्ष निमित्त माजी विद्यार्थ्याचा श्रीफळ देवून सत्कार करण्यात आले.त्यां नंतर जिल्हा परिषद धनोली शाळेतील विद्यार्थ्यानी स्वागत गीत सादर केले.
माजी विद्यार्थी मेळाव्यांचे आयोजन शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापक श्री.गवळी सर व तसेच गायकवाड मँडम यांनी केले होते. कार्यक्रमाठी शैक्षणीक वर्ष 1958 च्या माजी विद्यार्थी श्री. गणपत दगडू साबळे , श्री.नवसु हरी पाडवी,लक्ष्मण गोविंदा गांगुर्डे
मोतीराम बोवाजी दळवी ,पोपट लक्ष्मण दळवी, लक्ष्मण गोविंदा पाडवी, महादु मंगळू साबळे,यशवंत लक्ष्मण दळवी, काशिराम मंगळू पाडवी, भास्कर लक्ष्मण पवार, पांडूरंग चिंमणा जोपळे,जयराम मंगळू पाडवी, यशवंत मोतीराम आहेर, गोविंदा रामचंद्र साबळे, काशिराम मोतीराम आहेर हे माजी विद्यार्थी उपस्थित होते.
तसेच गावातील ग्रामस्थ,ग्रुप ग्राम पंचायत बापखेडा येथील सदस्य,सरपंच नामदेव पाडवी व तरुण मित्र स्नेह मेळाव्यात उपस्थित होते.
जिल्हा परिषद शाळेतील पहिल्या वेळी स्नेह मेळावा वर्धापन दिन साजरा केला म्हणून गवळी सरांना अजिंक्य फोटोस्टुडिओ माधव आहेर यांच्या कडून हार्दिक शुभेच्छा