लासलगाव महाविद्यालयात स्कूल कनेक्ट कार्यशाळेचे आयोजन
लासलगाव – येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दि 19 जून 2024 रोजी स्कूल कनेक्ट कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
शैक्षणिक वर्ष 2024 25 पासून महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 लागू होत आहे. या अनुषंगाने बारावी उत्तीर्ण व प्रथम वर्षासाठी विविध शाखेत प्रवेशित होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी व पालकांना नवीन शैक्षणिक धोरणाची माहिती व्हावी यासाठी या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. सदर कार्यशाळेत तज्ञ व्याख्याते श्रेयांक पद्धत, मेजर मायनर विषय, ऑन जॉब ट्रेनिंग, मूल्यवर्धित अभ्यासक्रम याविषयी सखोल मार्गदर्शन करणार आहेत. तरी या कार्यशाळेसाठी लासलगाव महाविद्यालयात 19 तारखेला सकाळी नऊ वाजता कॉन्फरन्स हॉल ग्रंथालय इमारत येथे विद्यार्थी व पालकांनी उपस्थित रहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य आदिनाथ मोरे यांनी केले आहे.