
जळगाव- जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस ठाण्याचे संशयित पी. एस. आय. कैलास ठाकूर यांना दहा हजार रुपयांची लाच स्विकारतांना जळगाव जिल्हा लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडल्याने जळगाव जिल्हा पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे. पी. एस. आय. कैलास ठाकूर यांना दिनांक १२/६/२०२४ रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही कारवाई करत ताब्यात घेण्यात आले.अशी प्राथमिक माहिती अधिकृत सुत्रांकडून मिळाली आहे.