संस्थापक अध्यक्ष माननीय श्री. कै.माणिक रघुनाथ मढवई माध्यमिक विद्यालय कोटमगाव येथे संस्थेचे संस्थापक यांचा जन्मोत्सव व लोक राजा छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी.
प्रतिनिधी श्री. ज्ञानेश्वर भवर.

कै. माणिक रघुनाथ मढवई विद्यालय कोटमगाव ता.निफाड.विद्यालयात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. मढवई यांचा जन्मदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. तसेच लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली . यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली याप्रसंगी क्रीडा स्पर्धा,निबंध स्पर्धा.वक्तृत्व स्पर्धा.,रांगोळी स्पर्धा, थाळी फेक,गोळा फेक अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.क्रीडा शिक्षक श्री. गांगुर्डे सर. सांस्कृतिक विभाग प्रमुख. श्री गलांडे सर यांनी स्पर्धांचे नियोजन केले. तर श्री. केदारे सर यांनी परीक्षक म्हणून भूमिका बजावली.
मढवई सर यांच्या जन्म उत्सव कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष. श्री. अमोल मढवई,संचालक श्री विलासराव सोमवंशी,गावचे उपसरंपंच श्री.योगेश बाळासाहेब पवार,श्री.एकनाथ काळे उपस्थित होते.शाळेतील विद्यार्थी कु.समीक्षा गांगुर्डे,प्रांजली मोरे,प्रणाली साप्ते,ललित समिक्षा पवार, प्राची देवरे यांनी मढवई सरांचे.शाळा व समाजकार्याची माहिती भाषणातून सांगितली.
मुख्याध्यापिका श्रीमती मढवई मॅडम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी त्यांच्या भावना दाटून आल्या.