
श्री चैतन्य कानिफनाथ महाराज मढी जिल्हा नगर या ठिकाणी रंगपंचमीला अतिशय थाटामाटात चैतन्य कानिफनाथ महाराजांची यत्रा भरली जाते या ठिकाणी लाखोच्या संख्येने भक्तगण उपस्थित असतात परंतु आज महाराष्ट्रामध्ये अचानक पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण असतानाच चैतन्य कानिफनाथ महाराज मढी या ठिकाणी सुद्धा अचानक आलेल्या वादळी वाराने मंडप उडाले या ठिकाणी अक्षरशः भाविकांनी लावलेल्या टेंथ व मंडप हवेने वरती उडालेले असताना भाविकांनी ते मंडप खाली खेचून धरावे लागले व पाऊस पडणे त्यामुळे यात्रे उत्सवाला वादळ वारा व पावसाची नजर लागली.रंगपंचमीच्या उत्साहाला या ठिकाणी लाखोच्या संख्येने नाथ भक्त पायी किवा आपल्या खाजगी वाहनाने बसने या ठिकाणी रंगपंचमीला मोठ्या संख्येने उपस्थित असतात परंतु अचानक आलेल्या पावसाने लहान मुलांना महिलांना लागल्यामुळे भाविकांमध्ये मनस्ताप व्यक्त करण्याची वेळ येऊन ठेपली आहे