माणिक रघुनाथ मढवई माध्यमिक विद्यालय कोटमगाव येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मढवई सर यांची जयंती उत्साहात साजरी
प्रतिनिधी श्री. ज्ञानेश्वर भवर

सविस्तर वृत्त असे की, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मढवई सर यांची जयंती विद्यालयात विविध क्रिडा व सांस्कतिक स्पर्धा आयोजित करून साजरी करण्यात आली.मुख्याध्यापिका श्रीमती मढवई मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.कबड्डी,खो,खो,गोळा फेक, थाळी फेक,लिंबू चमचा,निबंध स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा, दोरऊडी,रांगोळी,गायन अशा अनेक प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.स्पर्धांमध्ये बहुतांश विद्यार्थी सहभागी होऊन त्यांनी आपले कौशल्य दाखविले.स्पर्धा यशस्वितेसाठी, अशोक गलांडे, मगन केदारे, परशराम गांगुर्डे,जयेश कदम, बाळासाहेब दिवटे,ज्ञानेश्वर देवडे व विदयार्थी, व विद्यार्थिनी यांनी विशेष परिश्रम घेतले.
आज दिं .26/06/2024 रोजी माणिक रघुनाथ मढवई माध्यमिक विद्यालय कोटमगाव येथे संस्थेचे अध्यक्ष मढवई सर यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रथमतः सरस्वती माता व मढवई सर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मढवई सरांचे कार्य आपल्या भाषणातून सागितले त्यात कू. ललित ,सार्थक,प्रणिती,बंदरे तसेच संस्थेचे सचिव प्रतिक मढवई, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनिता माणिक मढवई,सांस्कृतिक विभाग प्रमुख अशोक गलांडे, मगन केदारे, क्रिडाविभाग प्रमुख परशराम गांगुर्डे,जयेश कदम यांनी मढवई सरांचे कार्य भाषणातून व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिवटे बाळासाहेब होते,तर सूत्र संचालन अशोक गलांडे यांनी केले.