चांदवडच्या वेदांता इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये स्नेहसंमेलन संपन्न

बुधवार दि. ३१ जानेवारी २०२४ रोजी वेदांता इंग्लिश मिडीयम स्कूलचे स्नेहसंमेलन चांदवड शहरातील राधाकृष्ण लॉन्स चांदवड येथे संपन्न झाले.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संजय पाडवी,प्रा. उदय वायकोळे व पत्रकार धनंजय पाटील हे उपस्थित होते.
यावेळी वेदांता संस्थेचे संस्थापक श्री विजय जाधव व संस्थेचे संचालक ऍड. बाळकृष्ण कावळे यांनी सांगितले की संस्थेने ज्युनिअर केजी पासूनच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना छान व्यासपीठ उपलब्ध केले आहे. विद्यार्थ्यांमधील विविध प्रकारचे कला-गुणांना अभिव्यक्त होतांना पाहणे हे एक मंतारलेले क्षण असल्याचा भास क्षणोक्षणी होत होता असे मत संजय पाडवी यांनी व्यक्त केले.
स्नेहसंमेलनाचे शुभारंभ सेवानिवृत्त सैनिक सौ.भारती व श्री.शिवाजी मैदुने व प्रगतीशील शेतकरी सौ. माधुरी व श्री. रामनाथ शेंडगे या दाम्पत्यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्या सौ. मोनाली सिसोदिया , सोनाली आहेर , मोनाली शिंपी इ. शिक्षकवृंद उपस्थित होते.स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात आनंददायी वातावरणात संपन्न झाले.