के. के. वाघ इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज काकासाहेबनगर येथे आषाढी वारी उत्साहात साजरी
प्रतिनिधी ज्ञानेश्वर भवर

के. के. वाघ इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज काकासाहेबनगर येथे आषाढी वारीचे औचित्य साधून शालेय परिसरात दिंडीचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थी हे वारकरी वेशभूषेमध्ये आलेले होते. या दिंडी सोहळ्यात विठ्ठल रुक्माई ची मूर्ती तसेच टाळ व मृदुंगाच्या घोषात विठ्ठल नामाचा गजर करण्यात आला त्यानंतर शालेय परिसरात रिंगण करून विद्यार्थ्यांनी आपल्यातील विविध कला गुण प्रदर्शित करत अभंग व भजन सादर केले.
या प्रसंगी प्राचार्य श्री. शरद कदम यांनी वारीचे व संत परंपरेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती. सुनिता काळे व शीतल टर्ले यांनी तर कार्यक्रमाचा समारोप श्री. यशवंत पवार यांनी केला.
याप्रसंगी श्री. विकास शिंदे, श्री. गणेश आवारे, श्री. किरण शिंदे, श्री. योगेश पुंड, श्री. उत्तम कर्वे, श्री. सचिन कोल्हे, श्री.शेख शादाब, श्री. संदीप शिंदे, श्री. चकोर स्वप्नील, श्री. योगेश खैरे, भाग्यश्री पानगव्हाणे, आढाव सोनाली, मोकळ अर्चना, भाग्यश्री खराक, बेंडके पल्लवी, रोशनी शिंदे, पल्लवी कोल्हे, शितल शिंदे, श्वेता पगारे, ज्योत्स्ना सोनार, दिपाली दाभाडे, पूनम अष्टेकर, सारिका कुशारे, योगिता जगझाप, सुरेखा सोनवणे, नेहा देसाई, रीना शिरसाठ, योगिता बिडवे आदी उपस्थित होते.