ताज्या घडामोडी
चांदवड तालुक्यातील भाटगांव येथे पावसासाठी सिद्धेश्वर महादेव पिंड महिलांनी पाण्याने भरली
ज्ञानेश्वर पोटे

पवित्र श्रावण महिना आणि रक्षाबंधनाचे औचित्य साधून भाटगांव येथील महिलांनी सिद्धेश्वर महादेव मंदिरात डोक्यावर पाणी आणून महादेव मंदिरातील पूर्ण गाभाऱ्यासह पिंड पाण्याने भरली.पाऊस नसल्याने दुष्काळाजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे,भाटगांव आणि परिसरातील सोयाबीन,मका अशा अनेक प्रकारच्या पिकांचे पाण्याअभावी करपायला सुरुवात झालेली आहे.शेतीसाठी पाणी मिळणे दुरच पण,इथे कमीत कमी जनावरे आणि माणसांसाठी चारापाण्याची सोय व्हावी म्हणून वरून राजाची कृपा होण्यासाठी महिलांनी मोठ्या कष्टाने दूरवरून पायपीट करीत भक्तीभावाने भाटगांव येथील सिद्धेश्वर महादेव मंदिरात डोक्यावर पाणी आणून संपूर्ण गाभाऱ्यासह महादेव पिंडवर जलाभिषेक करीत पाणी भरले.