सरस्वती शाळेमध्ये शहीद जवान जनार्दन ढोमसे यांच्या मातापित्यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण
कार्यकारी संपादक विकास कोल्हे

लासलगाव सरस्वती बालक मंदिर सरस्वती विद्यामंदिर व निर्मला माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ध्वजारोहण समारंभ याप्रसंगी वीर जवान जनार्दन ढोमसे यांची माता हिराबाई व पिता जनार्दन ढोमसे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी मणिपूर राज्यांमध्ये कार्यरत असलेले ब्राह्मण गावचे सुपुत्र विजय नवले हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान लासलगाव विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अशोकनाना होळकर यांनी भूषविले. याप्रसंगी शहीद जनार्दन तुमचे माता पिता यांचा सत्कार करण्यात आला तसेच प्रमुख अतिथी विजय नवले यांनी आपल्या मनोगतातून आपल्या संविधानाची ओळख करून देत सर्वांना जर देश सेवा करायची असेल तर देशाच्या सीमेवरच लढले पाहिजे असे नाही तर आपण देश सेवेसाठी आपला घर, शाळा व आपला परिसर स्वच्छ ठेवा हीच खरी देशसेवा असे सांगून विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या .याप्रसंगी लासलगाव विद्या प्रसारक मंडळाचे सचिव गुणवंतराव होळकर यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व समजावून सांगितले. संचालक डॉ विकास चांदर यांनी निर्मला सरस्वती संस्कृतिक उत्सवाचे व त्यात आयोजित विविध उपक्रमांचे विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे विशेष कौतुक आपल्या मनोगतामध्ये केले. याप्रसंगी शाळेमध्ये आयोजित क्रीडा स्पर्धा ,शिष्यवृत्ती स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा यामध्ये प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला .याप्रसंगी शाळेचे स्नेही रवींद्र पाटील, भरत वडनेरे, केशव जगताप ,अरविंद देसाई,असलम भाई, दायमा सर व संस्थेचे अध्यक्ष जगदीश होळकर ,उपाध्यक्ष सुलेमान मुलानी, सचिव गुणवंत होळकर ,संचालक बाळासाहेब बोरसे ,विकास चांदर अरविंद होळकर, शाळेचे मुख्याध्यापक भीमराव शिंदे व राजेंद्र महाले तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ जिरे, सुनील आव्हाड व कांचन शेलार यांनी केले.