
मंचर येथे उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यालयावर सहा दिवसापासून उपोषण चालू असून नारायणगाव नारायणगड येथे आदिवासी भिल्ल समाजाची वस्ती 127 घर वन विभाग अधिकारी यांनी जेसीबी, रोड रोलर लावून नष्ट केले ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत असून आज पाठिंबा देण्यासाठी राया ठाकर आदिवासी समाजसेवा संघटना पदाधिकारी अध्यक्ष कृष्णा भाऊ गोहीरे (API), कार्य अध्यक्ष धोंडीराम मसने, संस्थापक अध्यक्ष नामदेव मेंगाळ, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष लहू उघडे, नगर जिल्हाध्यक्ष गणेश मेंगाळ, सदस्य देविदास उघडे, अकोले तालुका उपाध्यक्ष मधुकर मेंगाळ, सागर मेंगाळ, शांताराम मेंगाळ, अक्षय बांगरे, बाळू अण्णा मेंगाळ, अण्णा तळपाडे, नारायण तळपाडे, दिनेश मेंगाळ, सुभाष मेंगाळ, भिल्ल समाज संघटना सुखदेव पवार, बिरसा ब्रिगेड भरत तळपाडे, आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडिया इगतपुरी तालुका अध्यक्ष सुनील बांगर, उपाध्यक्ष राजेंद्र लहामटे,आणि सर्व आदिवासी बांधव आणि सर्व आदिवासी संघटना या समाज बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी उपस्थित झाल्या, सर्व प्रकरणाची चौकशी करून लवकरच वन विभागाचे अधिकारी,पोलीस प्रशासन, यांनी बेकायदेशीर आदिवासी समाजाची घरांची नुकसान केली आहे आणि आदिवासी समाजावर उघड्यावर राहण्याचे आणि उपासमारीचे दिवस आणले आहे यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करून, समाज बांधवांना त्यांची जागा परत देण्यात येईल, असे उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे मागणी केली व तसेच समाज बांधवांना घर नसून नारायण गड या वस्तीसाठी राहण्यासाठी सरकारी जागा उपलब्ध करून द्यावा किंवा ज्या जागेवर सरकारने अतिक्रमण केलं आहे त्या जागेवर राहण्यास परवानगी द्यावी असे उपोषणकर्त्यांनी मागणी केली.