अंतर विभागीय मैदानी स्पर्धेत लासलगाव महाविद्यालयाचे घवघवीत यश
मुख्य संपादक राहुल वैराळ

लासलगाव – येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे झालेल्या अंतर विभागीय मैदानी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत उंच उडी, 4 ×100 मी.रीले (मुले) आणि 4 × 400 मी. (मुले) या तिनही क्रीडा प्रकारात लासलगाव महाविद्यालयाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रावीण्य मिळवले. पुढील स्पर्धेत महाविद्यालयातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली.
१) उंच उडी स्पर्धेत लासलगाव महाविद्यालयाचा सार्थक कोकणे याने 1.73 मीटर उडी मारून प्रथम क्रमांक प्राप्त केला.
२) 4 × 100 मीटर रिले या क्रीडा प्रकारात सचिन मघाडे, साईल शिंदे, आदित्य वेताळ, विशाल चौधरी या खेळाडूंनी प्रथम क्रमांक मिळवला.
३) 4 × 400 मीटर रिले या क्रीडा प्रकारात महाविद्यालयाच्या गोपाल कानडे, सचिन मघाडे, साहिल शिंदे, आदित्य वेताळ या खेळाडूंनी तृतीय क्रमांक मिळवला.
सर्व यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे, क्रीडा अधिकारी डॉ.नारायण जाधव, प्रा.गणेश जाधव यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. स्पर्धा यशस्वीतेसाठी क्रीडा अधिकारी डॉ.नारायण जाधव आणि प्रा.गणेश जाधव यांनी परीश्रम घेतले.