
भाटगांव- दिनांक 12/05/2024 रोजी चांदवड तालुक्यातील परसुल गावा सह परिसरात रात्री पासून वादळवाऱ्या सह वीजांचा कडकडाट होता,परसुल गावातील मळ्यामध्ये सकाळी 6 वाजेच्या दरम्यान घराच्या अंगणात सौ. शोभा निकम नामक महिला झाडलोट करत असतांना महिलेच्या बाजूला वीज पडली, त्या धक्क्याने महिला बेशुद्ध पडली घरातील व्यक्तींनी ताबडतोब महिलेस चांदवड येथे दवाखान्यात दाखल केले डॉक्टरांनी तपासणी करून महिलेस सकाळी 8 वाजेच्या दरम्यान मृत घोषित केले.सदर महिला श्री. कैलास चिंधू निकम यांच्या पत्नी होत्या व श्री.संजय चिंधू निकम यांच्या त्या भावजयी होत्या.तहसीलदार श्री. मंदार कुलकर्णी सर यांनी सदर महिलेच्या मृत्यूची नोंद करून घेतली व तालुक्यातील सर्व नागरिकांना जोपर्यंत अवकाळी व वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे,तो पर्यंत सावधानता बाळगण्याचे आवाहन केले.