लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार आणि; फसवणूकीच्या गुन्ह्यातील तिघांना अटक
जळगाव प्रतिनिधी

जळगाव शहरात लग्नाचे आमिष दाखवत महिलेसोबत शरीरसंबंध ठेवणाऱ्या फरार संशयीत आरोपीस अटक करण्यात आली आहे. याशिवाय व्यवसायात फसवणूक करणाऱ्या दोघांना देखील अटक करण्यात आली आहे. या दोन्ही गुन्ह्यातील एकूण तिघांना एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने पुणे येथून अटक केली आहे.
गणेश निवृत्ती सपकाळे, ( वय-३५) रा.भादली ता. जळगाव असे बलात्कार गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. भादली येथील मूळ रहिवासी व सध्या पुणे येथे राहणाऱ्या गणेश सपकाळे यांनी एका महिलेस लग्न करण्याचे खोटे आश्वासन दिले होते. त्याने महिलेसोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले होते. त्यानंतर तो फरार झाला होता या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तांत्रिक पूराव्याच्या आधारे गणेश निवृत्ती सपकाळे यास पुणे येथील शिरूर परिसरातून ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. व भंगारच्या व्यवसायात भागीदार होण्यासाठी विश्वास संपादन करून ११ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांना देखील एमआयडीसी पोलिसांनी पुणे येथून केली आहे. संतोष गुलाब खाडे आणि चंद्रकांत सुनील जाधव दोघे रा. हडसपार पुणे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांनी अब्दुल जब्बार कादर पटेल, रा. मेहरुण जळगाव यांची फसवणूक केल्या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तांत्रिक पूराव्याच्या आधारे क्राईम युनिट च्या मदतीने दोघांना पुणे स्टेशन रोड परिसरातून अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांचे पथकातील पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख, सहायक फौजदार आनंदसिंगसिंग पाटील, पो.नाइक विकास सातदिवे, पो.का छगन नाना तायडे, आदींनी कारवाईत सहभाग घेतला.