महाराष्ट्र सरकारने आता तरी शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करा ! संदीप पाटील यांची राज्य सरकारकडे मागणी

लोणार, आज दिनांक २० ऑक्टोबर रोजी ठीक ४ वाजता शासकीय विश्राम ग्रुह लोणार येथे लोणार तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
या पत्रकार परिषदेत खालील प्रकारे प्रतिक्रीया संदीप मापारी पाटील शिवसेना तालुका प्रमुख ,
गजानन जाधव सर शिवसेना शहर प्रमुख लोणार यांनी माडले आहे.
परतीच्या पावसाने राज्यात ठिकठिकाणी कहर केला असून, जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीतून कसेबसे वाचलेले पिकही उद्धवस्त झाले आहे. दिवाळीच्या तोंडावर मोठे संकट ओढवलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने किमान आतातरी सरसकट भरीव मदत जाहीर करावी,
मागील आठवड्याभरात सर्वत्र परतीच्या पावसाने उच्छाद मांडला. अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले. लोणार तालुक्यात जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी शेतात पाणी साचले. काढणीला आलेली पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. ठिकठिकाणावरून शेतकऱ्यांच्या नुकसानाची माहिती येत असून, राज्य सरकारने तातडीने पंचनामे न करता शेतकऱ्यांना सरसकट भरीव मदत जाहीर करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख संदीप मापारी पाटील, यांनी याबाबत त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले की, तालुक्यांतील सोयाबीनसारखे प्रमुख पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे. कापसाची बोंडे पिवळी तर ज्वारी काळी पडली आहे. कापणीच्या अंतिम टप्प्यात असलेल्या सोयाबीन मोठे नुकसान झाले आहे. खरीप हंगामाच्या सुरूवातीला झालेल्या अतिवृष्टीचा पीक विमा अद्याप शेतकऱ्यांना मिळालेला नाही. विमा कंपन्यांनी भरपाईची अग्रिम रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांमध्ये प्रचंड निराशा व असंतोष निर्माण झालेला आहे. या भयावह परिस्थितीची राज्य सरकारने दखल घेऊन तातडीने हेक्टरी 55 ते 60 हजार रूपयांची मदत जाहीर करावी, असेही शहर प्रमुख गजानन जाधव सर यांनी म्हटले आहे. यावेळी , शिवसेना तालुका प्रमुख.संदीप मापारी पाटील, शिवसेना शहर प्रमुख.गजानन जाधव सर, शिवसेना नेते असलम खान,शिवसेना शहर उपाध्यक्ष लुकमान कुरेशी,शाम राऊत, युवासेना शहर अध्यक्ष श्रीकांत मादंकर, तानाजी मापारी,सुदन अंभोरे,कैलास अंभोरे, युवा नेता एकबाल कुरेशी, भागवत सावळे, रतन मोरे, आदी. लोणार तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पद अधिकारी कार्यकरते उपस्थित होते.