लासलगाव विंचूर सह 16 गाव पाणीपुरवठा योजनेच्या जीर्ण झालेल्या पाईपलाईन दुरुस्तीला 17 कोटी 15 लक्ष रु. च्या कामाला सुरुवात. शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या पाठपुरावाला अखेर यश
मुख्य संपादक राहुल वैराळ

लासलगाव,विंचूर सह 16 गाव पुरवठा योजना पाईप लाईन जीर्ण झाल्यामुळे वारंवार गळती होऊन पाणी पुरवठा विस्कळीत होत होता. गेल्या पाच वर्षा पासून नागरिक पाण्यासाठी त्रस्त झाले होते.यावर्षी देखील ऐन पावसाळ्यात लासलगाव विंचूर सह 16 गाव पाणी पुरवठा योजनेवर अवलंबून असलेले नागरिक पाण्याकरिता वनवण भटकत होते.सुमारे एक,एक महिना पाणी उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले होते
कित्येक वर्षापासून सदरील योजना दुरुस्ती बाबत शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील व पदाधिकाऱ्यांचा पाठपुरावा सुरु ठेवला होता. याबाबत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील , पालकमंत्री छगन भुजबळ साहेब यांना कित्येक वर्षापासून वेळोवेळी भेटून पाणीटंचाई बाबत संपूर्ण माहिती शिवसेना पदाधिकारी देत होते.त्यांनी याबाबत मुंबई मंत्रालयात,नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय तसेच येवला व लासलगाव येथे अधिकारी वर्गाची बैठक बोलावून योग्य ती कार्यवाही करण्याचे सूचना केल्या होत्या ,परंतु तीन महिन्यापूर्वी सरकार बदल झाल्यामुळे या कामाकडे पुन्हा दुर्लक्ष झाले होते.
याबाबत लासलगाव शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रकाश पाटील यांनी तात्काळ शिवसेना पदाधिकारी यांना सोबत घेऊन पालक मंत्री नामदार दादासाहेब भुसे यांना तसेच केंद्रीय आरोग्य मंत्री भारतीताई पवार यांना लासलगाव विंचूर सह 16 गाव पाणीपुरवठा योजना दुरुस्ती बाबत विशेष लक्ष घालून दुरुस्तीचे काम सुरू करण्याची विनंती केली होती.गेल्या पाच वर्षांपासून आजवर केलेले विविध आंदोलन,निवेदन याबाबत वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या त्यांना दाखविल्या होत्या.तसेच केंद्रीय आरोग्य मंत्री
विद्यमान पालक मंत्री दादाजी भुसे साहेब केंद्रीय आरोग्य मंत्री खा. भारती ताई पवार यांनी सदरील योजना दुरुस्ती काम तात्काळ सुरू करिता अधिकारी वर्गाना आदेश करून पाणी पुरवठा योजना जलद गतीने दुरुस्ती सुरु करण्यात यावी व पूर्ण करावी तसेच पाण्यापासून नागरिक वंचित राहणार नाही याची दखल घ्यावी असे आदेश दिले होते .
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नाशिक यांनी मंत्री महोदयांच्या सूचनेचे पालन करत योजनेबद्दल असलेली सर्व पूर्तता ताबडतोब पूर्ण केली .यापैकी एक निविदा मंजूर होऊन लासलगाव विंचूर सह 16 पाणीपुरवठा योजना दुरुस्ती कार्यारंभ आदेश निर्गमित करण्यात आला आहे.दोन महिन्यात जुने व जीर्ण झालेले पाईप बदलून कायमस्वरूपी उपाययोजना होणार आहे.वरील आदेशानुसार आज मंगळवार दिनांक 18, 10 ,2022 रोजी सकाळी जेसीबी मशीन ने नांदूर मधमेश्वर धरणाजवळ पाटावर पाईप लाईन दुरुस्ती च्या कामाला ठेकेदाराने सुरुवात केली आहे.
पाणी पुरवठा योजनेवर कोरोना काळातील शासन नियुक्त तत्कालीन प्रशासक जनार्दन सोनवणे साहेब, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे बिन्नर साहेब तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाने योजना दुरुस्ती बाबत सखोल अभ्यास करून संपूर्ण अहवाल तयार केला होता.तसेच निफाड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संदीप कराड यांनी देखील वेळोवेळी मार्गदर्शन करून प्रत्यक्ष धरणार जाऊन योजनेची पाहणी केली होते.
16 गाव पाणीपुरवठा पाईपलाईन दुरुस्तीचे न काम सुरु झाल्याबद्दल
पालकमंत्री दादासाहेब भुसे, केंद्रीय आरोग्य मंत्री भारतीताई पवार, आमदार छगनराव भुजबळ ,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमिषा मित्तल मॅडम सो,
उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी सो,निफाड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संदीप कराड, विस्तार अधिकारी जनार्दन सोनवणे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे अशोक बिन्नर , सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाचे तसेच वेळोवेळी पाणी टंचाई संदर्भात बातम्या प्रसिद्ध करणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांचे शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश पाटील व सर्व पदाधिकारी, तसेच कित्येक वर्षापासून पाण्यासाठी त्रस्त असलेल्या नागरिकांनी,माता भगिनी यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.
लासलगाव विंचूर सह 16 गाव पाणीपुरवठा योजेनेवर अवलंबून असेलेल्या पाण्यासाठी त्रस्त असलेल्या महिला भगिनी यांना पालकमंत्री दादाजी भुसे साहेबांनी दिवाळी भाऊबीज निमित्त मिळवून दिलेली ही खूप मौल्यवान भेट म्हणावी लागेल.सर्व माता भगिनी यांची पाण्याकरिता होणारी वनवण शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे कायमची थांबणार आहे.