लासलगाव महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन
मुख्य संपादक राहुल वैराळ

लासलगाव- नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लासलगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना (+2 स्तर) विभागाच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक प्रा.उज्वल शेलार, प्रा.रावसाहेब खुळे, प्रा.श्रीमती दीपाली कुलकर्णी, प्रा. लता तडवी, प्रा.जितेंद्र देवरे, प्रा.महेश होळकर, प्रा.रामनाथ कदम, प्रा.गणेश जाधव, प्रा,अर्षद शेख, प्रा.अनुया नवले, सर्व प्राध्यापक वर्ग तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांच्या हस्ते पूष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. विद्यार्थी किर्ति गांगुर्डे, कोमल पवार, कावेरी भोकनळ, आदित्य पवार, वैष्णवी घोडे, मानसी पगारे, प्रसाद गवळी यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर भाषणे झाली. यावेळी पर्यवेक्षक प्रा. उज्वल शेलार यांनी देखील विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याबद्दल माहिती सांगितली. याप्रसंगी सर्व प्राध्यापक वर्ग आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर निकम या विद्यार्थ्याने केले तर आभार प्रणिता कोल्हे या विद्यार्थिनीने मानले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर, प्राचार्य डॉ.दिनेश नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच कार्यक्रम यशस्वीेतेसाठी उज्वल शेलार, प्रा.महेश होळकर, प्रा.रामनाथ कदम, राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक यांनी प्रयत्न केले.