एस.टी.महामंडळाच्या नाशिक विभागातील लासलगांव आगारातील कर्मचाऱ्यांचे काम कौतुकास्पद
ज्ञानेश्वर पोटे

लासलगाव – आपल्या आगारातील सर्व कर्मचारी मित्रांना पिण्याचे थंड पाणी मिळावे यासाठी आगारातील सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून स्वखुशीने सर्वांनी वर्गणी जमा करून पिण्याच्या पाण्याचा कुलर फिल्टर विकत घेतला.लासलगांव आगारातील या कर्मचाऱ्यांचे हे कार्य खरंच खूप कौतुकास्पद आहे, लासलगांव आगारातील कर्मचाऱ्यांच्या या कार्याचा आदर्श इतरही आगारातील कर्मचाऱ्यांनी घेण्यायोग्य आहे,त्यामुळे लासलगांव आगारातील सर्व कर्मचाऱ्यांचे मनापासून खूप खूप अभिनंदन . यावेळी सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने पाण्याचा योग्य वापर करावा, पाणी पिण्यासाठीच आहे,पाणी सांडू नये घरात जसे आपण सर्व गोष्टींची चांगली नीगा राखतो तसाच कुलर जवळील परिसर निर्मळ ठेवावा,कोणीही तिथे थुंकू नये, हात व तोंड धुऊ नये,फक्त पाणी बॉटल भरून घ्यावी असे आवाहन आगारातील सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने सर्व कर्मचाऱ्यांना करण्यात आले.