मौजे कातरवाडी तालुका चांदवड जिल्हा नाशिक येथील कातरवाडी गावाच्या विद्यमान सरपंचांना गावातील सद्य परिस्थिती बद्दल नागरिकांनी विचारलेले काही प्रश्न
ज्ञानेश्वर पोटे

कातरवाडी – गावातील सध्याची परिस्थिती बघता विद्यमान सरपंच महोदय यांना नागरिक या नात्याने काही प्रश्न विचारावेसे वाटले ते पुढील प्रमाणे…
प्रश्न क्रं १- तुम्हाला कातरवाडीतील जनतेविषयी इतकी तिरस्काराची भावना का आहे ? येथील लोक तुम्हाला तुमचे दुश्मन किंवा विरोधक वाटतात का? का तुम्ही गावातील जनतेला मूर्ख,गुलाम,विकत घेतलेले समजता …._exception_… अपना काम बनता भाड मे जाये जनता_ तुम्ही या विचाराने प्रेरित झाला आहात का ?
प्रश्न क्रं २- वैयक्तिक वादामुळे पूर्ण गावाचे रस्त्यांची अडवणुक का करत आहे ? (कातरवाडी ते वडगाव, कातरवाडी ते नगरचौकी, कातरवाडी ते अंकाईबारी , कातरवाडी ते कातरणी या गावांना जोडणारे मुख्य रस्ते पूर्णपणे खराब झाले आहे, या रस्त्यांनी शाळेची लहान मुले ये-जा करतात तुम्ही तुमची स्वतःची मुले या रस्त्यांनी पायी किंवा सायकलवर शाळेत पाठवाल का? तुम्हाला या मुलांविषयी सहानुभूती किंवा प्रेम नाही का? का तुम्ही यांना जनावरे समजत आहे ,या मुलांचे हेच पाप आहे की त्यांचा जन्म कातरवाडी गावात झाला ? या निरागस चिमुकल्यांच्या पायांना तुम्ही अजून किती त्रास देणार आहात…?)
प्रश्न क्रं ३- माननीय सरपंच महोदय तुम्ही स्वतः मागील ९ ते १० वर्षापासून गावचे प्रथम नागरिक सरपंच हे पद भूषवत आहात आम्हाला आनंद आहे की ,गावची एक महिला या पदावर विराजमान आहे ,परंतु तुम्ही हे पद फक्त प्रतिष्ठेसाठी भूषवत आहात का, मागील ९ ते १० वर्षापासून महिलांसाठी कुठले ठोस व भरीव काम केले आहे…? महिलांचा आरोग्याचा किंवा शौचालयाचा प्रश्न असेल यावर कोणते कामे केले गेले …???
प्रश्न क्रं ४- गावातील ज्वलंत पाण्याचा प्रश्न यावर काय काम केले…?
प्रत्येक घरासमोर नळ व त्या नळाला स्वच्छ पिण्याचे पाणी हे स्वप्न देखील पूर्ण होऊ शकले नाही ,टँकरनी येणारे पाणी पिण्यायोग्य आहे किंवा नाही याची तुम्ही कधी चाचणी केली का ..? आता पावसाळा सुरू झाला आहे ,हातपंप व बोअरवेल यांना नवीन पाणी उतरले आहे यातून पोटाचे विकार उद्भवतात यावर ग्रामपंचायत स्तरावर तुमच्याकडून काय उपाय योजना आहेत..?
प्रश्न क्रं ५- गावातील वाढते नशेचे प्रमाण , वाढते तरुणांतील नैराश्य, वाढती गुन्हेगारी यावर ग्रामपंचायत लेवलवर कोणते कामे केले गेले..? प्रश्न क्रं ६- 2023- 24 , 2024-25 या आर्थिक वर्षासाठी ग्रामपंचायत पातळीवर काही व्हिजन आहे का , सर्व अनागोंदी कारभार चालू आहे…
(परत निवडणूक परत लक्ष्मी दर्शन परत अडवणूक ही शृंखला असीच चालू राहणार का)
पुढील प्रश्न नागरिकांसाठी…
तुम्ही मतदानाच्या आदल्या रात्री विकले जातात का…?