ताज्या घडामोडी

प्रकाश आंबेडकर यांची जरांगे पाटलासह छगन भुजबळ यांना खुली ऑफर

नाशिक प्रतिनिधी

*प्रकाश आंबेडकर यांची जरांगे पाटलासह छगन भुजबळ यांना खुली ऑफर*

 

नाशिक भुजबळ शंभर टक्के ओबीसी वादी आहेत, परंतु त्यांचा पक्ष ओबीसी वादी आहे का? याचा खुलासा भुजबळच करू शकतात .

विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटील यांनी मराठा उमेदवार उभे करण्याबाबत २९ ऑगस्टला निर्णय घेऊ असे जाहीर केले. त्याप्रमाणे त्यांनी उमेदवार उभे करावे असे आव्हानही आंबेडकर यांनी सोमवारी नासिक येथील त्र्यंबक नाका परिसरातील एचआरडी सेंटर मध्ये राजकीय पक्ष आदिवासी संघटनेच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आंबेडकर पुढे म्हणाले ओबीसी आणि मराठा हे काही ठिकाणी जाहीरपणे तर काही ठिकाणी सुप्तपणे एकमेकांच्या विरोधात आहेत. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावे या जरांगे पाटील यांच्या मागणीला राजकीय पक्षांनी अद्याप उत्तर दिलेले नाही. आम्ही मात्र ओबीसी मधून आरक्षण देता येणार नाही अशी भूमिका जाहीरपणे मांडली आहे. एकमेकांना मतदान करणार नाही असे दोन्ही समाज घटक जाहीरपणे बोलत आहेत. ही परिस्थिती निर्माण होण्यास राजकीय पक्ष तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार, देवेंद्र फडणवीस ,उद्धव ठाकरे यांच्यासारखे नेते जबाबदार आहेत, असेही त्यांनी म्हटले .ओबीसीचे आरक्षण ओबीसींनाच ठेवून इतरांनाही आरक्षण कसे द्यायचे याचा फार्मूला आमच्याकडे तयार असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. हे सरकार भ्रष्टाचाराचे माहेरघर आहे, अटल सेतू ,समृद्धी महामार्गावरही खड्डे पडत असून भ्रष्टाचाराकडे झुकलेले सरकार महिलांना सुरक्षा देऊ शकत नाही. अशी टीकाही त्यांनी केली. एकमेका विरोधात द्वेश पसरवून राजकीय पक्ष जनतेची मानसिकता बिघडवीत असल्याचा आरोप ही आंबेडकरांनी यावेळी केला .राज्यातील आदिवासीच्या राजकीय आणि सामाजिक संघटना ह्या वंचित बहुजन आघाडी एका छत्राखाली आणण्याच्या प्रयत्नात असून या आघाडीचे एक सप्टेंबरला नामकरण ठेवण्याचे ते बोलत होते. बैठकीला गोंडवना जनतंत्र पार्टीचे अध्यक्ष हरेश ओके, अमित तडवी ,एकलव्य आघाडीचे अमित जाधव, भारत आदिवासी पार्टीचे सुनील गायकवाड, आदिवासी एकता परिषदेचे कैलास माने, महाराष्ट्र आदिवासी अभियानाचे शुभम राऊत, आदिवासी बचाव अभियानाचे अशोक बागुल, आदी उपस्थित होते .विधानसभेला एकत्रितपणे सामोरे जाण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. आदिवासी आणि ओबीसींना एकाच व्यासपीठावर आणण्याच्या वंचित बहुजन आघाडीचा प्रयत्न असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले. आदिवासी आरक्षित मतदारसंघाबरोबरच अन्य मतदार संघामध्ये देखील आदिवासींना उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा आंबेडकर यांनी व्यक्त केली.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.