संभाजीराव माने स्मृती राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्त्तृत्व स्पर्धेत बिद्रीची कु.मधुरा मारुती पाटील विजेती

रुकडी /प्रतिनिधी
येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयात रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल व नारायणदास दामोदर भंडारी फाऊंडेशन इचलकरंजी यांच्या वतीने घेण्यात आलेल्या संभाजीराव माने स्मृती राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्त्तृत्व स्पर्धेत दूधसागर महाविद्यालय बिद्रीची कु. मधुरा मारुती पाटील यांनी प्रथम क्रमांक मिळविला तर द्वितीय क्रमांक डी.के.टी.ई.काॅलेज इचलकरंजीच्या कु. ऋतुजा सतीश पोवार, तृतीय क्रमांक डॉ. दीपक पाटील आयुर्वेदिक महाविद्यालय कोल्हापूरच्या कु. ऋतुजा शिवदास मुंडे, उत्तेजनार्थ शिवराज महाविद्यालय गडहिंग्लजच्या श्री. संकेत कृष्णात पाटील यांनी मिळविला विजेत्या स्पर्धकांचा रोख रक्कम, प्रशस्तिपत्र व गौरव चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.परीक्षक म्हणून डॉ.प्रतिभा पैलवान, डॉ.विकास विभुते व श्री.संदीप व्हनाळे यांनी काम पाहिले.
पारितोषिक वितरण शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे प्र-कुलगुरू डॉ.पी. एस.पाटील यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला. यावेळी वार्षिक क्रीडा स्पर्धेतील विजेते स्पर्धक, वर्षभर संपन्न झालेल्या विविध निबंध स्पर्धा, वक्त्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धेतील विजेते तसेच विद्यापीठ परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना प्र-कुलगुरु डॉ. पी. एस. पाटील म्हणाले विद्यार्थी दशेतील वय हे भांडवल आहे, त्याचे योग्य नियोजन करून यश प्राप्त करा. संघर्ष केल्याशिवाय यश प्राप्त होत नाही याची जाणीव ठेवून यश प्राप्त होईपर्यंत विचलित होऊ नका.
स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांतकुमार कांबळे यांनी केले. संभाजीराव माने यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी अभिवादन केले. या बक्षीस वितरण समारंभास रो.यतीराज भंडारी, रो.सुरेश रोजे, प्राचार्या डॉ.आरती भोसले प्राचार्या डॉ. स्मिता राणे, प्राचार्या सौ. उज्वला बुल्ले, मुख्याध्यापिका सौ. पद्मजा पाटील, मुख्याध्यापिका सौ. आशा सूर्यवंशी, श्री. कालिदास धनवडे, श्री. भाऊसाहेब वडार, कु.क्षितीजा बागडी, बाळासाहेब माने एज्युकेशन ट्रस्टच्या सर्व शाखांचे शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. आभार डॉ. गिरीश मोरे यांनी मानले तर सूत्रसंचालन डॉ. माधवी सोळांकुरकर यांनी केले.