लासलगांव ग्रामपंचायती ने लासलगाव करांचे कसे आरोग्य घातले धोक्यात

लासलगाव आशिया खंडातील नावलौकिक असलेली बाजारपेठ व पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत अशा या ग्रामपंचायत मधील वार्ड 2 बनलाय एक गलिच्छ व दुर्गंधीमय व आरोग्यासाठी घातक ठिकाण कारण या दोन नंबर वार्ड मधील ग्रामपंचायत सदस्य आपल्याच वार्ड मधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात असताना यांचं लक्ष लासलगाव कोटमगाव रोड गॅस गोडाऊन समोर अंडरग्राऊंड नाली फुटली आहे. याकडे लक्ष नाही येथे डासांचे व किडे व अळया होऊन नागरिकांचे आरोग्य व पर्यावरण धोक्यात आहे.
या परिसरात पूर्ण कचरा असून येथे नाल्याची व कचऱ्याची दुर्गंधी पसरली आहे,त्यामुळे स्थानिक व येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका असल्याचे नागरिक सांगत आहे.
महाराष्ट्रात नवीन रोगाने डोकं वर काढलं आहे.
नागरिकांनी स्थानिक प्रतिनिधी, ग्रामपंचायत च्या ही बाब लक्षात आणून दिली.
परंतु त्यांनी तात्पुरते काम करून लोकांची तोंड बंद करण्याचा एक प्रयत्न केला.
काम करूनही परिस्थिती तशीच आहे.
नागरिकांना आपण चुकीच्या उमेदवाराला निवडून दिल्याची खंत वाटत असल्याचे नागरिक म्हणत आहेत.
कारण येथील ग्रामपंचायत सदस्य कॉलनीतील तसेच वार्ड मधील असून,नागरीकांच्या समस्याकडे व तसेच कामाकडे दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या वार्ड मधील सदस्य फक्त पाच वर्षांनी निवडणूक आली की, चेहरे दाखवतात बाकीचे दिवस जातात कुठे नागरिकांना पडला प्रश्न ?
वारंवार सांगूनही जाणूनबुजून दुर्लक्ष लासलगाव ग्रामपंचायत, कर्मचारी व सदस्य करत आहेत.
तसेच सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने दुर्गंधी पसरलेली आहे.
यापासून रोगराई पसरत आहे,तसेच आजरपण वाढू शकते.
तसेच स्थानिक दुकानदार व्यवसाय कॉलनीतील लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून प्रशासनास कंटाळून लोकांना नाईलाजास्तव हा त्रास सहन करावा लागतो.
दुर्गंधीमुळे नाक बंद करून ये-जा करावी लागते.
तसेच कॉलनीतील व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रस्ता असल्यामुळे,मोठ्या प्रमाणावर ये- जा असते.
HP गॅस ऑफिसमध्ये ये – जा जास्त प्रमाणात असल्यामुळे नागरिकांना त्रास होतो.
घाणीचा वास येत असल्यामुळे दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरत आहे.
काही ग्रामपंचायत सदस्य कॉलनीतील असून ते सुद्धा दुर्लक्ष का करतात ?
नागरिकांना पडलेला प्रश्न ?
एवढी मोठी ग्रामपंचायत असताना अंडरग्राउंड नाली फुटलेली आहे.
तरी प्रशासन झोपलेलं कसं ? प्रशासन ला जाग कधी येणारं
ग्रामपंचायत कर्मचारी उडवा उडवी चे उत्तर देतात व विषय टाळतात.
लासलगाव ग्रामपंचायती चे तसेच वार्ड 2 मधील निवडून आलेले सदस्यांचे पण नागरिकांच्या समस्या कडे दुर्लक्ष नागरिकांनी तक्रार तरी कोणाकडे करायची असा येथील
नागरिकांना पडलेला मोठा प्रश्न ?
फक्त आणि फक्त निवडणूक आल्या की तेवढ्या पुरतं ग्रामपंचायत आणि सदस्य काम करणारं का ? वार्ड 2 मध्ये अशी अवस्था आहे,तर बाकीच्या वार्डातील काय अवस्था असेल, लासलगाव परिसरात असलेल्या नागरिकांना पडलेला प्रश्न आणि समस्या कडे कोण लक्ष देणार
नागरिक विचारतं आहे.