
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे यांच्या वतीने महार वतन जमिनी महार वतनदारांना परत करा या मागणीसाठी आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष मा. दीपकभाऊ निकाळजे साहेब यांच्या आदेशानुसार पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे यांच्या वतीने आझाद मैदान मुंबई या ठिकाणी दिनांक २०/०१/२०२४ रोजी पासून आमरण उपोषण सुरू आहे प्रमुख मागण्या महार वतन जमिनी महार वतनदारांना परत करा, महार वतन जमिनीवर लागलेले कुळ रद्द करा, महार वतन जमिनीचे झालेल्या अनधिकृत खरेदी विक्रीचे व्यवहार रद्द करा, तसेच महार वतन जमिनी पुन्हा महार वतनदारांना हस्तांतर करा या मागण्यासाठी गेल्या पाच दिवसापासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आमरण उपोषण सुरू आहे तरीही महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांनी ज्यांच्या जमिनी अनधिकृत कुणाच्या ताब्यात असतील तसेच अनधिकृतपणे खरेदी-विक्रीचे व्यवहार झालेले आढळतील अशा सर्व जनतेने संपर्क साधून आमरण उपोषणासाठी जाहीर पाठिंबा द्यावा असे आव्हाहन आमरण उपोषण करते उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे यांनी केले आहे