पांडूरंग नगर रस्ता लगतच्या कुटुंबा कडून विंचूर ग्रामपंचायत ला निवेदन
मुख्य संपादक राहुल वैराळ

विंचूर निफाड रोडवरील विंचूर मल्टीस्पेशलिटी हॉस्पीटल मागें पांडुरंग कॉलनीतील
रस्ता लगतच्या कुटुंबाकडून या निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली आहे कि, विंचूर मल्टीस्पेशलिटी हॉस्पीटलच्या पाठीमागील रस्त्याचे काम ग्रामपंचायत ने करण्यास सुरुवात केली आहे.तरी सदर रस्ता यापूर्वी प्लॅनच्या ले आऊट प्रमाणे रितसर ९.00 मीटर झालेला नसून तो एकाबाजूला तयार करण्यात आलेला आहेत.
हा रस्ता तयार झाल्यास सदर गल्लीतील पूर्व एका बाजूच्या कुटुंबावर कायम स्वरुपी अन्याय होणार आहेत.
तरी आपण ले आऊट नुसार ९.00 मीटर रस्ता डिमाकैशन पॉईंट ची दोन्ही बाजूने खात्री करून मध्य ठरविण्यात यावा.
यांसाठी आपल्या विभागामार्फत सक्षम अधिकारी, कर्मचारी यांनी प्रत्यक्ष येऊन शहानिशा करून आम्हा कुटुंबांचे समाधान करून आमच्या वर होत असलेला अन्यायवर कायमस्वरूपी प्रश्न सोडवून आम्हाला न्याय मिळवून द्यावा.
अशी कुटुंबातील सदस्य कडून मागणी करण्यात आली आहे.
निवेदन देताना ,सुमन जगताप, शांताबाई उकाडे,नंदा सोनवणे,रेखा साळुंखे,अण्णा कुमावत,वसंत काळे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे निफाड तालुका कार्य अध्यक्ष अभय पाटील उपस्थित होते.