वेळापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली
दिपक गरुड

बासाहेबांना संविधानाचे जनकही म्हटले जाते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण 6 डिसेंबर रोजी झालं होतं. स्वातंत्र्योत्तर भारतात तत्कालीन अस्पृश्यांच्या स्वातंत्र्याला काहीच किंमत नसेल, तर त्यातून अधिक गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतील. तसे होऊ नये यासाठी बाबासाहेबांनी सामाजिक सुधारणा आणि अस्पृश्यता निर्मूलन ही कार्ये करण्याला अधिक प्राथमिकता दिली. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जितके महान राजकारणी होते तितकेच त्यांचे विचारही महान होते. जीवन जगण्याची कला त्यांच्या महान विचारांमध्ये दडलेली आहे, ज्यातून आपण सर्वजण प्रेरणा घेऊ शकतो. व बाबासाहेबांचे विचार व वारसा पुढे चालवू शकतो.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षय गरुड,विलास गरुड,राहुल बारसे,दीपक गरुड,अनिल गरुड,राजू बदामे,किशोर गरुड,मोहन डावरे व इतर ग्रामस्थांनी आदरांजली वाहिली.