इंडिगो एअरलाइन्स चा गलथानपणा प्रवासी पोहोचले हैदराबादला मात्र लगेच नाशिकलाच
नासिक प्रतिनिधी

नाशिक – हैदराबाद इंडिगो या विमानाने प्रवास करणाऱ्या 85 प्रवाशांना इंडिगो चा गलथानपणा व सावळ्या गोंधळाचा फटका बसला आहे .नाशिक येथील ओझर विमानतळावरून मंगळवारी(दि. 11 दुपारी 2:20 मिनिटांनी) एअर्स लाईनची नाशिक हैदराबाद फ्लाईट होती या विमानाने 85 प्रवासी नाशिक येथून हैदराबादला जाणार होते, मात्र विमानातील तांत्रिक बिघाडीमुळे हे विमान तब्बल एक तास उशिराने हैदराबाद कडे मार्गस्थ झाले. सायंकाळी विमान हैदराबाद विमानतळावर पोहोचल्यानंतर प्रवासी आपले लगेच ताब्यात घेण्यासाठी गेले असता, त्याचे सामान विमानातून आलेलेच नसल्याचे समजले . विमानातून प्रवास करणाऱ्या साऱ्या प्रवासाचे समान हे नाशिक विमानतळावरच राहिल्याने विमान कंपनी प्रशासनाकडून प्रवाशांना सांगण्यात आले . नाशिक विमानतळावर राहिलेले प्रवाशांचे लगेज हे बुधवारी तारीख 12 सायंकाळी आणण्यात येईल असे एअरलाइन्स प्रशासनाकडून प्रवाशांना सांगण्यात आले. त्यामुळे या विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्तापला सामोरे जावे लागले. अनेकांना आपला पुढचा प्रवास रद्द करावा लागला असून प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. त्यातील काही प्रवाशांना हैदराबाद विमानतळावरून अन्य ठिकाणी प्रवास करायचा होता ,मात्र त्यांचे लगेच ना आणल्याने त्यांची मोठी अडचण व गैरसोय झाल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.