
आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थिनींना उच्च शिक्षणात पूर्ण शैक्षणिक वर्षासाठी पूर्ण शुल्क माफी करण्याचा निर्णय शिंदे सरकारकडून घेण्यात आला आहे. उच्च व तांत्रिक मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून ही माहिती देण्यात आली आहे. शैक्षणिक संस्थांच्या या खर्चाची परतफेड महाराष्ट्र सरकार करणार असून जास्तीत जास्त मुलींनी उच्च शिक्षण घ्यावे, यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी झालेल्या कुलगुरूच्या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली आहे. सध्या मुलींना 50 टक्के शुल्क माफी देण्यात येत होती, आता ती 100% पर्यंत देण्यात येणार आहे.