
जालना येथील आंतरवली सराटी येथे झालेल्या मराठा समाजातील आंदोलनावर अमानूषपणे लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ लासलगाव सह 46 गाव कडकडीत बंद ठेवण्यात आला.लासलगाव परिसरातील सर्व समाज बांधव एकत्र जमत भगरीबाबा
मंदिरापासुन भव्य मोर्चा काढून सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून पोलिस स्टेशन पर्यंत मोर्चा काढण्यात आला.या वेळी स.पो.नि.राहुल वाघ साहेब यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.या वेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत आंतरवली सराटी येथील घटनेचा निषेध व्यक्त केला.