जय संघर्ष ड्रायवर संघटनेच्या लढ्याला लवकरच मिळणार यश.

जय संघर्ष ड्रायव्हर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व छत्रपती संभाजी नगरचे रहिवाशी आसणारे श्री संजय हाळनोर यांच्या मार्गदर्शना खाली दि. 13/12/2023 रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.मोर्चा मधे दहा हजारांच्या वर वाहन चालक,चालक मालक सहभागी झालेले होते.
जय संघर्ष संघटनेच्या विविध मागण्यांचे निवेदन घेऊन एक शिष्ट मंडळ मंत्री दादा भुसे यांचे भेटीस तर दुसरे शिष्ट मंडळ नमो नमो मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष श्री हातवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली परिवहन सचिव श्री पराग जैन साहेब मंत्रालय महाराष्ट्र राज्य, श्री जे.बी.पाटिल साहेब परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य,श्री लोथी साहेब परिवहन उप-आयुक्त महाराष्ट्र राज्य यांची भेट घेऊन वाहन चालकांसाठी सुरक्षा, विश्रांती,फायनंस कंपनीचे वसुली कर्मचारी तसेच टोल नाक्यावर वरील गुंड प्रवृत्तींच्या कर्मचाऱ्यां पासून वाहन चालकांना होणार्या त्रासा बद्दल सविस्तर माहिती देऊन स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात हि योजना फक्त वाहन चालकांच्याचसाठी महत्वाची नसून रोडवर चालणार्या सर्वच जन माणसासाठी किती महत्वपूर्ण आहे याबाबत देखील सविस्तर माहिती देऊन त्याच बरोबर वाहन चालकांसाठीचे कल्याणकारी आसणारे आर्थिक महामंडळाची आणू मैक्सी कैबचे परमीटची देखील लवकरात लवकर आमल बजावणी करूण लाखो,करोडो वाहन चालकांना दिलासा देण्यात यावा असे संबंधित शासकीय व प्रशासकीय अधिकार्यांना विनंती करण्यात आली.
ना.श्री दादा भुसे यांच्या भेटी मधे जय संघर्ष संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय हाळनोर,सचिव निखिल कुलकर्णी,मोहशिन कुरैशी,अहेमद बाबा बाग्गीवाले तसेच विजयभाऊ गिरासे यांचा शिष्ट मंडळात समावेश होता.तर प्रशासकीय अधिकारी यांच्या भेटिस नमो नमो मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष श्री हातवार साहेब,जय संघर्ष संस्थेचे प्रदेश अध्यक्ष श्री प्रवीण वाघ, जीवन हंकारे, चंदू पवार, प्रमोद कासार, महादेव कोळी,रहेमान तांबोळी,शेख शकीर, प्रफुल्ल वैद्य,अमोल खापेकर तसेच छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार रविंद्र सुरडकर इ.समावेश होता.