L.I.C. च्या माध्यमातून रयत शिक्षण संस्थेचे न्यु इंग्लिश स्कूल टाकळी……
संपादक सोमनाथ मानकर

आज L.I.C. च्या माध्यमातून रयत शिक्षण संस्थेचे न्यु इंग्लिश स्कूल टाकळी – विंचूर मधील गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी L.I.C. पिंपळगाव शाखाधिकारी श्री. संजयजी मोरे ,L.I.C. पिंपळगाव शाखा विकास अधिकारी तसेच पिंपळगाव शाखा टाकळी – विंचूर मधील विमा (M.D.R.T. – अमेरिका ) प्रतिनिधी श्री. विकास काळे यांच्यामाध्यमातून हा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमात ऑर्केस्ट्रा म्युझिक मेलङीज चे संचालक सुप्रसिद्ध गायक, निवेदक. तुषार कुमार देवरे यांनी गणेश वंदना व विविध गितं खास आकर्षण खेळ मांडला या गीताने प्रेक्षकांची वाह वाह मिळविली
या ठिकाणी रयत शिक्षण संस्था टाकळी विंचूर येथील 11 विद्यार्थ्यांना ट्रॉफी देण्यात आल्या तसेच सर्व अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स कार्यकर्ती यांचे देखील सत्कार करण्यात आले LIC पिंपळगाव शाखा शाखाधिकारी संजय मोरे, विकास अधिकारी राजेंद्र ठाकरे, विमाप्रतिनिधी श्री विकास मधुकर काळे, पंचायत समिती सभापती श्री शिवा सुरासे, सरपंच अश्विनी जाधव, मुख्याध्यापक लभडे सर, शरद भाऊ काळे श्री केशवराव जाधव रयत शिक्षण संस्थेचे सर्व शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते