तहसीलदार हटाव हातकणंगले तालुका बचाव-सतिश माळगे.

दि.०३/०८/२०२३ इचलकरंजी प्रतिनीधी-
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)पक्षाच्यावतीने उपविभागीय अधिकारीसो इचलकरंजी यांच्या समोर हातकणंगले तहसीलदार यांच्या मनमानी कारभार व शासनाचा महसूल बुडवून भूमाफियाना मदत होईल असे व गोरगरीब वंचित मागासवर्गीय भटक्या जाती जमातींना टारगेट करून त्यांचा पारंपारिक व्यवसायावर गदा आणून तसेच गौण खणीकर्म धंद्यामध्ये शासकीय तिजोरी खाली करून स्वतःची तिजोरी भरणाऱ्या तसेच आर्थिक लालचे पोटी नियमां च्या विरुद्ध जाऊन निकाल देणाऱ्या हातकणंगले तालुक्याचे तहसीलदार यांच्या कारभाराची खाते निहाय चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी इचलकरंजी यांच्या दारात तिव्र निदर्शने करून निवेदन देण्यात आले
या आंदोलनाची दखल नाही घेतल्यास लोकशाही पद्धतीने धरणे आंदोलन, उपोषण, मोर्चे आणखी तीव्र करू असा इशारा रिपब्लीकन पक्षाच्या वतिने जिल्हा नेते सतीश माळगे यांनी दिला यावेळी खंडू कुरणे, शिरीष थोरात, जावेद मुजावर, अजय सांगरुळकर,अतुल कोठावळे,रोहित कांबळे,विनोद कांबळे,प्रणव पाटील यांच्यासह रिपब्लीकन पक्षाचे कार्यकर्ते उपस्थीत होते.