जिल्हा परिषद शाळा विंचूर येथे प्रवेशोत्सव साजरा

विंचूर : सन 2023 24 या शैक्षणिक वर्षाच्या प्रथम दिवशी जिल्हा परिषद शाळा विंचूर येथे प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला याप्रसंगी विद्यार्थ्यांचे प्रभात फेरी काढून नवागतांचे स्वागत करण्यात आले तसेच या कार्यक्रमासाठी लासलगाव पोलीस स्टेशनचे पीएसआय श्री राहुलजी वाघ साहेब यांनी सुद्धा उपस्थिती दर्शवली आपल्या मनोगतातून त्यांनी त्यांच्या मुलाच्या प्रवेशोत्सवाची आठवण सांगितली स्वतःच्या प्रवेशाची सुद्धा आठवण सांगितली आणि जिल्हा परिषदेमार्फत नवागतांचे स्वागत अनोख्या पद्धतीने केले जाते ही अतिशय संस्मरणीय बाब आहे असे सांगितले त्यांनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केला शाळा व्यवस्थापन समितीचे पालकांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले तसेच याप्रसंगी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे निफाड तालुका अध्यक्ष श्री दत्तात्रय दरेकर, तसेच विंचूर पत्रकार संघाचे अध्यक्ष माननीय श्री दादाभाई काद्री तसेच किशोरजी पाटील आदि पत्रकार बांधव उपस्थित होते तसेच ज्ञानेश्वर दरेकर सुनील दरेकर अशोकराव दरेकर प्रकाश दरेकर सुधाकर क्षीरसागर नसरीन शरीफ पठाण सूर्यभान जाधव तसेच शाळेचे मुख्याध्यापिका सुनीता कदम या उपस्थित होत्या तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत देवरे सर यांनी केले व आभार शालन कदम यांनी मानले