जि.प. उपाध्यक्ष मा.सुहासदादा नाईक यांचा आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठान तर्फे सत्कार
वैभव गायकवाड

खांडबारा:- धनगर जातीला अनुसूचित जमाती मधून आरक्षण मिळावे यासाठीच्या दाखल याचिकेला आवहान देणारी याचिका आदिवासी हक्क संरक्षण समितीचे सचिव याचिकाकर्ते जि.प.उपाध्यक्ष मा.सुहास नाईक यांनी कडवे आव्हान दिले. अनेक वर्षापासून सुरू असलेल्या या न्यायालयीन लढ्यात नाईकांना अखेर यश आले. धनगरांच्या या मागणीला मा.मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. या ऐतिहासिक निकालानिमित्त आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठान व कोकणी समाजाच्या वतीने जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मा.सुहास नाईक यांचा सत्कार करण्यात आला.
कोकणी समाजाच्या सामाजिक व शैक्षणिक उत्थानासाठी कार्य करणे उच्च शिक्षित अधिकारी व कर्मचारी यांच्या सहभागाने सुरू झालेल्या आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठान च्यावतीने दरवर्षी समाजातील विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा या उदात्त हेतूने कला व क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.
यावर्षी ढोंग ता.नवापूर येथे आज पासून सुरू झालेल्या दोन दिवसीय *आदिवासी कला व क्रीडा महोत्सव 2024* चे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रियाताई गावित यांच्या हस्ते तर माजी खासदार बापू चौरे यांच्या अध्यक्षतखालील तसेच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, प्रतिष्ठान अध्यक्ष यशवंत पवार, उपाध्यक्ष जगन्नाथ गायकवाड, कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव गजमल पवार मा.सभापती रतीलाल कोकणी, प्रा.मंगलदास अहिरे, कोकणा कोकणी, डोंगऱ्यादेव माऊली संघर्ष समितीचे अध्यक्ष वासुदेव गांगुर्डे, समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुलाब पवार, प्रा. सुलतान पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
तसेच दुपारपर्यंत झालेल्या क्रीडा स्पर्धांमधील प्रथम, द्वितीय, तृतीय आलेल्या खेळाडूंचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व समाजातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.