मुडशिंगी ता हातकणंगले येथे महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया

दि.८ जानेवारी सरपंच गजानन जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ग्रामसभेमधील निवडणूकित हनुमान ग्राम विकास आघाडीचे उमेदवार माजी ग्रामपंचायत सदस्य निवास चौगले ६५२ इतकी मते घेऊन विजयी झाले.तर विरोधी उमेदवार शरद धोंडीराम पोवार यांना २४४ मते पडली.तसेच ऐनवेळी मतदाना दिवशी सिकंदर पेंढारी यांनी शेवटच्या दहा मिनिटात माघारी घेऊन निवास चौगले यांना आपला पाठींबा दिला.
निवडीनंतर गुलालाची उधळण व फटाक्यांच्या आतषबाजीने परिसर दणाणून गेला.निवडीनंतर बोलताना चौगले म्हणाले की गावात शांतता व सलोखा राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू,तसेच स्व.गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या संकल्पनेतून पोलिसांवरील कामाचा ताण कमी तसेच गावातील किरकोळ भांडणे गावातच मिटावीत यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू असा विश्वास निवास चौगले यांनी यावेळी व्यक्त केला.या निवडीबद्दल त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.निवडणूक अधिकारी म्हणून सरपंच गजानन जाधव ग्रामसेवक संदीप खाबडे यांनी काम पाहिले.ग्रामपंचायत चे कर्मचारी प्रमोद गुरव,इकबाल सनदी,गौतम कांबळे,अंगणवाडी सेविका व शिक्षक यांनी प्रशासनास सहकार्य केले.