क्रांतिवीर वसंतराव नाईक महाविद्यालयात माता पालक मेळावा उत्साहात संपन्न
मुख्य संपादक राहुल वैराळ

दिंडोरी : येथील क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या, कला व वाणिज्य महाविद्यालयात माता पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला. यावेळी मंचावर आहार व वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. जयश्री नागरे, व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या संचालिका श्रीमती रेखाताई कातकाडे, दिंडोरी येथील नगरसेविका कल्पना गांगोडे, श्रीमती पल्लवी चव्हाण, प्राचार्य डॉ. राजेंद्र सांगळे, उपप्राचार्य डॉ. सुनील उगले, समन्वयक डॉ रुपाली शिंदे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात क्रां. वसंतराव नाईक तसेच सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी डॉ. जयश्री नागरे यांनी ग्रामीण भागातील महिलांचे व मुलींचे आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करून, चांगले आरोग्य ठेवण्यासाठी कोणती काळजी घ्यावी या संदर्भात मार्गदर्शन करीत वैयक्तिक आरोग्य व आहार याविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी संचालिका रेखाताई कातकाडे यांनी उपस्थित माता पालक यांच्याशी संवाद साधत मुलींशी संवादी राहून त्यांचे प्रश्न समजून घेण्याचे आवाहन माता पालकांना केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजेंद्र सांगळे यांनी आजच्या काळात मुलींना आणि महिलांना करीअर करण्यासाठी विविध संधी उपलब्ध असून शासन सुद्धा या बाबतीत संवेदनशील सकारात्मक असल्याने त्याचा त्यांनी योग्य तो उपयोग करून घ्यावा असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रूपाली शिंदे यांनी तर प्रमुख अतिथींचा परिचय प्रा सुनीता बागुल यांनी करून दिला. कार्यक्रमाचे आभार प्रा.सुनीता आव्हाड यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. योगिता ढाकणे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाचा विद्यार्थीनी मंच व सखी सावित्री मंच अंतर्गत करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला कविता बोडके, निर्मला पवार, निर्मला टोंगारे, सुनीता चव्हाण, वंदना वडजे यांचेसह माता पालक उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रचार्यांचंय मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या आय.क्यू. ए. सी. प्रमुख प्रा. वैशाली गांगुर्डे, प्रा. तेजस्विता मुंढे,प्रा.तुकाराम भवर यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाला माता पालक आणि विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.