लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सभापती पदी श्री.बाळासाहेब क्षीरसागर व उपसभापती श्री.गणेश डोमाडे यांची बिनविरोध निवड
दिपक गरूड

आशिया खंडातील नंबर एक गणली जाणारी बाजार समिती म्हणून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे नाव लौकिक आहे अशा बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक रंगतदार झालेली बघितलेली आहे यात श्री.पंढरीनाथ थोरे , श्री.डी के जगताप व श्री.जयदत्त काका होळकर व श्री.बाळासाहेब क्षीरसागर यांनी पॅनल उभा करून 9 व 8 अशा जागा जिंकत व एक अपक्ष यांनी बाजी मारली.
आज सभापती आणि उपसभापती पदाची निवड होण्यासाठी दोन्ही पक्षांची वरिष्ठ नेत्यांची चर्चा होऊन समन्वय साधून सभापती पदासाठी श्री.बाळासाहेब क्षीरसागर यांनी फॉर्म भरला व उपसभापती पदासाठी श्री.गणेश डोमाडे यांनी फॉर्म भरला,निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सभापती म्हणून श्री. बाळासाहेब क्षीरसागर व उपसभापती श्री गणेश डोमाडे यांची अविरोध निवड करण्यात आली असे घोषित करण्यात आले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार श्री.शरद घोरपडे ,निफाड यांनी काम बघितले व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी श्री.राहुल वाघ साहेब यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
त्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद साजरा केला.