
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाटगांव येथे स्वामी विवेकानंद,मॉंसाहेब जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.सदर उत्साहामध्ये विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा करून थोर पुरुषांचे विचार कथन केले याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री.जाधव सर,श्री.गवळी सर,सौ.गायकवाड मॅडम,सौ.बच्छाव मॅडम आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.