राज्यातील महिलांसाठी” हर घर दुर्गा अभियान” लवकरच सुरू होणार, राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे वक्तव्य
नाशिक प्रतिनिधी

नाशिक सध्या महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे वाढते प्रमाण लक्षात घेता, राज्यातील प्रत्येक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये “हर घर दुर्गा अभियान” राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योगमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
राजमाता जिजाऊ आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आदींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातील घरोघरी अन्यायाविरुद्ध लढणारी दुर्गा तयार व्हावी या उद्देशाने हर घर दुर्गा अभियान सुरू करण्यात येणार आहे.
ज्याप्रमाणे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शारीरिक शिक्षणाचा तास घेतल्या जातो, त्याप्रमाणे मुलींसाठी atma आत्मसुरक्षा प्रशिक्षणासाठी राखीव ताशिका असावी यासाठी राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पुढाकार घेतला आहे .
शारीरिक शिक्षणाप्रमाणेच वर्षभर महिलांसाठी कराटे, जुडो यासारख्या संरक्षणाच्या पायाभूत प्रशिक्षणाच्या आठवड्यातून कमीत कमी दोन तासिका घेण्यात येणार आहेत, त्याद्वारे आपत्कालीन आणि आव्हानात्मक परिस्थितीत सक्षमपणे लढण्याची ताकद महिलांना यावी त्याकरिता हे प्रशिक्षण देण्यासाठी स्थानिक स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य सुद्धा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थिनींना नियमित सरावासाठी अध्दयुक्त करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.