सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजना शिरोळ तालुक्या मद्ये खेड्या पाड्या वाड्या वस्त्या मद्ये पोचवणार रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (A) युवा नेते आलोक कडाळे

शिरोळ : सामजिक, आर्थिक, शैक्षणिक बौद्धिक स्तर सुधारण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजना तालुक्यातील गावा गावामध्ये आणि शहरा शहरांमध्ये पोहोचवणार व समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यास प्रयत्न करणार असल्याची माहिती कडाळे यांनी दिली या वेळी समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. पुढे म्हणाले कालखतीत अरुण कडाळे साहेब असताना समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेच्या माध्यमातून 50 ते 60 भूमिहीन मागासवर्गीय लाभार्थ्यांना यशस्वीरीत्या लाभ मिळवून देण्यात आले. यामुळे लाभार्थ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत झाली आहे. पण सध्या या योजनेमध्ये जाचक अटींची वाढ झाली असल्याकारणाने या अटी कमी व्हाव्यात व अल्पभूधारकांना ही याचा लाभ घेता यावा बाजार भावाप्रमाणे अनुदानात वाढ व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले यावेळी शिरोळ तालुका अध्यक्ष बाबुराव कांबळे, शिरोळ शहराध्यक्ष विक्रांत कांबळे, सचिव कुमार कांबळे, व शिरोळ रिपब्लिकन मुस्लिम सेनेची अध्यक्ष आझाद तहसीलदार कार्यकर्ते उपस्थित होते.