चोकाक येथे राष्ट्रीय महामार्गाचे मोजणीचे काम बोगस नोटीस दाखवून दमदाटी करून सुरू केले

रत्नागिरी – नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील चोकाक येथे शुक्रवारी सकाळी आकरा च्या दरम्यान प्रस्तावित मार्गासाठी मोजणी सुरू असलेले मोजणीचे काम राष्ट्रीय महामार्ग अन्याय निवारण कृती समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी एकत्र येऊन बंद पाडले असताना प्राधिकरण कार्यालयात जावून प्राधिकरण प्रकल्प संचालक वसंत पंडकर यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय कोणतेही काम सुरू करणार नसल्याचे आश्वासन दिले असताना लगेच दोन दिवसांनी हातकणंगले भूमी अभिलेख विभागाचे कर्मचारी राहुल पाटील यांनी पोलिस बंदोबस्तात काम सुरू केले परिणामी शेतकरी एकत्र येऊन हे काम बंद केले तसेच सदर जागा मालकांना कोणतेही नोटीस दिली नसल्याचे कबूल केले व ही मोजणी दमदाटी करून सुरू केली असल्याचं ही यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी सांगितले तसेच वेळप्रसंगी आंदोलन करण्याचे ही यावेळी सांगण्यात आले यावेळी सदर नोटीस वर कोणत्याही अधिकाऱ्याची सही नसल्याने सदर नोटीस बोगस असल्याचा दावा यावेळी उपस्थित बाळासो लोहार सर यांनी केला यावेळी उपस्थित आनंदा पाटील, बाळासो लोहार,(सर), संजय सुर्यवंशी , सुरेश वाघमारे, संतोष सुतार, सुरेश लोहार , कुमार लोहार, सागर कांबळे, दिनकर चव्हाण, पाटोळे साहेब, अजित महाले, यशवंत चोकाककर, युवराज नंदिवाले यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.