लासलगाव महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९२वी जयंती उत्साहात साजरी

लासलगाव:- भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखविणाऱ्या स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या, महिलांना स्वावलंबनाचा महामंत्र देणार्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय लासलगाव येथे १९२वी जयंती बालिका दिन आणि महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करण्यात आली.
याप्रसंगी पर्यवेक्षक श्री उज्वल शेलार, श्री सुभाष रोटे, कार्यक्रम अधिकारी श्री देवेंद्र भांडे, श्री सुनील गायकर तसेच सर्व प्राध्यापक वर्ग आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर, प्राचार्य डॉ.दिनेश नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच कार्यक्रम यशस्वीेतेसाठी रा.से.यो. च्या सर्व स्वयंसेवकांनी प्रयत्न केले.