
जम्मू कश्मीर मधील डोळा परिसरात सोमवार (दि. 15 रात्री ) अचानक दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या तुकडीळवर हल्ला केला. दहशतवादी आणि सुरक्षा दल यांच्यात झालेल्या चकमकीत अधिकाऱ्यासह चार जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली आहे. जम्मूच्या डोळा जिल्ह्यातील धारी घोट मुरारबागी या परिसरातील जंगलात सोमवारी रात्री उशिरा ही चकमक सुरू झाली.
या चकमकीत चार जवान शहीद झाले असून काही जवान जखमी झाल्याची माहिती सूत्राकडून मिळाली आहे. जम्मू-काश्मीर पोलीस आणि जवान दहशतवाद्याविरोधात सर्च ऑपरेशन करत आहेत.रोडा मार्गावर हाय अलर्ट देण्यात आलेला आहे. भारतीय सैन्य दलाची या भागावर नजर असून प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येत आहे. डोडामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती, त्यामुळे कारवाई करण्यासाठी जात असताना अचानक गोळीबार सुरू झाला ,भारतीय जवानांनी दहशतवाद्यांच्या गोडीबाराला चोख प्रत्युत्तर दिले मात्र याचकमकी दरम्यान चार जवान शहीद झाले. जवानांकडून दहशतवाद्यांचा शोध घेणे सुरू आहे. अजूनही या भागात सर्च ऑपरेशन आणि चकमक सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. अमरनाथ यात्रेला दहशतवादी टार्गेट करणार असल्याची माहिती मिळाली होती. मात्र दहशतवाद्यांचा डाव भारतीय सैन्य दलाने उधळून लावला होता. त्यानंतर आता तोडा परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती .तिथे कारवाईला जात असताना अचानक चकमक झाली आणि हा सगळा प्रकार घडण्याची माहिती मिळाली आहे .