
देवाची करणी नारळात पाणी या म्हणीप्रमाणे ग्रामपंचायत भाटगाव आणि नारायणगाव या दोन्ही गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे सध्या चालू असलेली केद्राई पाणीपुरवठा योजना पाणी कमी असल्या कारणाने तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेली होती परंतु दोन्ही गावच्या विद्यमान सरपंच उपसरपंच व गावकरी यांनी निर्णय घेऊन केद्राई येथील विहिरीजवळ बोरवेल घेऊन पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवला त्या बोरवेलला भरपूर पाणी लागल्याने दोन्ही गावच्या गावकऱ्यांचे तहान भागलेली आहे या कामे दोन्ही गावच्या सरपंच उपसरपंच सदस्य यांनी ग्रामविकास निधी या माध्यमातून अथक परिश्रम करून बोरवेल मंजूर करून घेतला या कमी भाडगावचे विद्यमान सरपंच सौ पगार व नारायणगावचे विद्यमान सरपंच सौ सोनवणे उपसरपंच सिताराम मांदळे उपसरपंच किरण भवर आदी मान्यवरांनी परिश्रम घेतले याप्रसंगी भाटगावचे सरपंच सौ पगार नारायणगावचे सरपंच सौ सोनवणे सदस्य रावसाहेब पोटेकिरण मोरे कवात मांदळे आदी मान्यवर उपस्थित होते