
लासलगाव:-
चांदवड – लासलगांव – विंचूर राज्य महामार्ग क्रमांक – ७ आणि मार्गावर लासलगाव शहरात काँक्रीटिकरण केलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले होते, तसेच त्यामधील स्टील देखील वर आले होती गेल्या कित्येक वर्षापासून लासलगाव – विंचूर मार्गावरच्या साईड पट्ट्या भरल्या गेल्या नव्हत्या तसेच वेग मर्यादा बाबत मार्गदर्शन फलक लावावे.अनेकदा गतिरोधक बसविणे बाबत देखील मागणी केली होती.प्रवाशांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना पायी व सायकल चालवीतांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग अधिका-यांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या वाहनांचे अपघात होऊन मोठ्या प्रमाणावर जिवीतहानी व नुकसान होत होते.
याबाबत शिवसेनेच्या वतीने प्रकाश पाटील व सहकारी यांनी पालक मंत्री दादा भुसे साहेब यांना दिनांक 17 डिसेंबर रोजी समक्ष भेटून निवेदन दिले होते.याची दखल घेत पालक मंत्री यांनी सर्व समस्यांकडे तत्काळ लक्ष देण्याबाबत वरिष्ठ अधिका-यांना सुचना केल्या होत्या.तसेच लेखी आदेश पारित केले होते.
सार्वजनिक बांधकाम विभागाने आज दिनांक 28 डिसेंबर रोजी तात्काळ कॉक्रीरीट रोडवरील खड्डे बुजविण्यास सुरवात केली आहे.तसेच स्टेशन रोडवरील अवजड वाहनांना अडचण होणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी देखील सुरु केली आहे.
रस्त्याच्या साईट पट्ट्या भरण्याकरिता लवकर निधी उपलब्ध करून काम सुरू करणार असल्याची माहिती निफाड सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता गणेश चौधरी यांनी दिली.
रस्ता दुरुस्ती व झाडांच्या वाढलेल्या फांदया तोडण्याची कार्यवाही सुरु केल्या बद्दल नागरिक,शालेय विद्यार्थी
प्रथमेश सोनवणे,साहिल शेख,गौरी मगर,श्रावणी पाटील यांचेसह अनेक पालकांनी समाधान व्यक्त करत, पालक मंत्री व शिवसेना पदाधिकारी यांना धन्यवाद दिले.
रस्ता दुरुस्ती प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश पाटील,भारतीय जनता पार्टी तालुका उपाध्यक्ष रवींद्र होळकर,सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब छत्र होळकर,अनिश शेख, व्यावसायिक सुरेश कुर्याकोट, खलील पठाण ,चण्या भाई पाटेवाले,दीपक गायकवाड, रिजवान शेख ,गणेश कायस्थ यांचे सह अनेक नागरिक उपस्थित होते.