चांदवड तालुका पाकिस्तान मध्ये आहे का ? सर्वात जास्त दुष्काळ चांदवड तालुक्यात होता तरी अनुदान,विमा पासून शेतकरी वंचित तालुक्यातील शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
ज्ञानेश्वर पोटे

भाटगांव- चांदवड तालुका हा २०२३-२४ ला सर्वात जास्त दुष्काळ ग्रस्त होता तरी पण चांदवड तालुका अनुदान विमा पासून वंचित असल्याने शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहे.
सन 2023- 24 या वर्षात प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शासनाने एक रुपयात पिक विमा दिल्याने नाशिक जिल्ह्यात पाच लाख 89 हजार शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला. 2023-24 वर्षात पावसाने दांडी मारल्याने मोठ्या प्रमाणात खरीप पिकांचे नुकसान झाले, पर्यायाने नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, सिन्नर,येवला, हे तालुके दुष्काळी जाहीर करण्यात आले परंतु, चांदवड तालुक्यात सर्वात जास्त दुष्काळात असूनही चांदवड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आला नाही. 2023-24 मध्ये शासनाने एक रुपयात पिक विमा योजना चालू केली त्या योजनेचा चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांनी शंभर टक्के फायदा घेतला. पण त्या पीक विमा योजनेतून चांदवड तालुका वगळल्याने शेतकरी या एक रुपयाच्या पिक विमा पासून वंचित राहिला आहे, याबाबत स्थानिक लोक प्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी, मागणी चांदवड तालुक्यातील शेतकरी वर्गाकडून होत आहे.