रुकडी येथे अमितकुमार भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली रेल रोको आंदोलन
प्रतिनिधी शितल कांबळे

हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथे रुकडी गावचे सुपुत्र मा उपसरपंच एडवोकेट अमितकुमार भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली आज पुन्हा एकदा रेल रोको आंदोलन करण्यात आले त्यावेळी आंदोलन कर्ते आक्रमक झाले होते यावेळी अनेक समस्या. मांडल्या गेल्या त्यामध्ये रुकडी भुयारी मार्गातील समस्या सोडविण्यासाठी रेल्वे विभागाने सुमारे 75 लाख रुपये निधी मंजूर करून दिला आहे त्याचे काम लवकरच सुरू करत आहोत असे रेल्वे विभागीय अधिकारी त्यानंतर एक्सप्रेस रेल्वे रूकडी आणि गांधीनगर येथे थांबवण्यात यावे ही मागणी व इतर अन्य मागण्या एक महिन्यात मंजूर करा अन्यथा आणखीन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला. स्टेशन मास्तर यांनी या सुविधांसाठी आणखी कालावधी द्या अशी विनंती केली यावेळी पोलिस आणि आंदोलक यांचे मध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आंदोलनकर्त्यांनी असा सवाल केला की गेली तीन वर्षे आम्ही तुमच्या आश्वासनानंतर माघार घेत आलो आहोत आता पोकळ आश्वासने चालणार नाहीत अस यावेळी उपस्थितांनी ठणकावून सांगितले यावेळी रेल्वे अधिकारी यांनी लेखी आश्वासन देऊन आंदोलन स्थगित करा असे आवाहन केले, या आश्वासनानंतर मा एडवोकेट अमितकुमार भोसले यांनी एक महिना फक्त मुदत वाढवून घेतली त्यानंतर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले यामध्ये प्रामुख्याने मा एडवोकेट अमित कुमार भोसले, सरदार शेख कुमार चव्हाण, सुनील भारमल , हनीफ पाटील, संजू कोळी, जितू देसाई, सुरेश लोखंडे, डी आर माने, , डिग्रेजे व्ही एन,, ओंकार पोळ,, शेख, एम एम,, पोलीस पाटील कविता कांबळे,बाळासो लोहार, अमर आठवले, सुरज नामे, आबु मुजावर, आपू कापसे, व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.