ताज्या घडामोडी
आषाढी वारीला अवकाश असतांना पंढरपुरात भाविकांची पांडूरंगाच्या दर्शन बारीत चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती
ज्ञानेश्वर पोटे

पंढरपूर– आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्रातील आणि इतर शेजारच्या राज्यातून पांडुरंगाचे वारकरी, भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर पंढरपुरात गर्दी करत आहेत.आज सकाळच्या सुमारास भाविक मोठ्या संख्येने विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी रांगेत उभे होते ,दरम्यान रांगेमध्ये बॅरिगेटिंग नसल्यामुळे चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.मंदिर समितीचे एकही सुरक्षारक्षक रांग नियंत्रित करण्यासाठी तिथे उपस्थित नव्हते,त्यामुळे तिथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.